राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या उदगीर तालुका कार्याध्यक्षपदी प्रदीप जोंधळे यांची निवड


उदगीर [ प्रतिनिधी ] राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा श्री बसवराज पाटील नागराळकर साहेब व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा श्री. संजयभाऊ बनसोडे साहेब यांच्या शिफारसीनुसार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदनभैया पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा शिवाजी मुळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे साहेब यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते प्रदीप जोंधळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या उदगीर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली. या निमित       रा. काँ. पार्टी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक  विभागाचे प्रदेश सरचिटणीस अजिमभाई दायमी, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, शफी हाशमी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदीप जोंधळे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, धनाजी बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष अजहर शेख, शहराध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा सरचिटणीस अतिक सर ,अबरार पठाण, बालाजी कांबळे , अजय शेटकार, अजम पटेल,रविंद्र सोमवंशी, विजयकुमार भालेराव, उत्तम वाघमारे, उत्तम सूर्यवंशी, राहुल शिंदे, विठ्ठल वाघमारे , मुन्ना मदारी, सोनू हाशमी, वसीम बाबा खाजा पटेल, राजरत्न सोमवंशी, आदीनी अभिनंदन केले आहे.