उदगीर येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवकांचा सुपत उपक्रम
कोराना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून भाजीविक्रेते ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना मोफत मास्कचे केल वाटप
सध्या कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत .... वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत.... साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता 30 ते 40 रुपये ला मिळू लागले आहेत , आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, भाजीविक्रेते यांना मास्क वापने खर्चिक वाटत असल्यामुळे ....या मास्कचा वापर करत नसल्याची बाब उदगीर येथील ... एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या वेदांत शिरगिरे या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर ... त्यांनी स्वखर्चातून पाचशेपेक्षा अधिक मास्क घरीच तयार करून वाटप करण्यास सुरुवात केलीय ... एक मास्क साधारण सात ते आठ तास वापरात येऊ शकतो. पुन्हा ते मास्क बदलावा लागतो ... दिलेला मास्क खराब झाल्यानंतर पुन्हा हे शेतकरी , भाजीविक्रेते ,ज्येष्ठ नागरिकांना मास्क खरेदी करून वापरणे हे न परवडणारे वाटत असल्यामुळे ते वापरणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन ...त्यांनीअगदी दीड रुपयात टिशु पेपर वर रबर बँड चा वापर करून घरच्याघरी मास्क कसा तयार करायचा याचे प्रात्यक्षिक ....व कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजी ची माहिती ....त्यांनी यावेळी शहरातील ठिकाणी जाऊन .... या भाजी विक्रेत्यांना , ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा वसा त्यांनी घेतलाय ....कोरोनाचा सामना करत असताना... गोरगरिबांची आर्थिक गणितही बिघडली नाही पाहिजे ...ही भावनाघेऊन वेदांत शिरगिरे या तरुणाने केलेल्या कार्याचं कौतुक सर्वस्तरातून होतंय...