सोमनाथपुर ता. उदगीर येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भुकंप व पुनर्वसन राज्यमंत्री मा. ना. श्री. संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड, जलकुंभ, पर्यावरण पुरक गोकास्ट व गोपुजन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री. बसवराज पाटील नागराळकर साहेब, श्री. चंद्रकात अण्णा वैजापुरे साहेब, प्रवीण मेंगशेट्टी साहेब, डॉ. भिकाणे साहेब, डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.