उदगीर: 9 मार्च मनसेचा वर्धापन दिन आज संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक पक्षाचा वर्धापन दिन विविध पद्धतीने साजरा करतात त्या अनुषंगाने उदगीर मनसेने चिघळी, सोमनाथपूर,चिंचोली येथील तरुणाचा प्रवेश घेऊन वर्धापन दिन साजरा केला उदगीर तालुक्यातील चिघळी या गावातील तरुण कुलदीप शिंगळे, महारुद्र स्वामी, शिवपाल गुरुडे, दीपक बिरादार,संदीप गोरूडे यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश केला यावेळी कुलदीप शिंगळे यांनी माननीय राज साहेब व मनसे हा पक्ष संघर्ष करणारा असून सर्वसामान्य गोरगरीब रयतेला न्याय मिळवून देणारा असल्यामुळे आपण मनसेत प्रवेश करत आहोत अशी भावना व्यक्त केली तसेच यावेळी जळकोट तालुक्यातील चिंचोली येथील बालाजी पांगरे, संग्राम बिरादार,बालाजी यादव, सोमनाथपूर येथील दयानंद डोंगरे यांनीही त्या सहकार्यासह मनसेत प्रवेश केला. उदगीर येथील विश्रामगृह येथे उदगीर विधानसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे प्रवेश घेण्यात आले या सर्वांना संजय राठोड उपजिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला यावेळी संग्राम रोडगे तालुकाध्यक्ष उदगीर , बाळासाहेब शिवशेटे तालुका अध्यक्ष जळकोट, भानुदास राजेकर तालुका सचिव, गंगाधर पिटाळे तालुका उपाध्यक्ष ,संतोष भोपळे शहर उपाध्यक्ष, लखन पुरी शहर उपाध्यक्ष,शिवराज ढोले,संजय केंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.