भाजपाच्‍या जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी बालाजी गवारे यांची निवड

लातूर दि१४ : भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्‍हाध्यक्षपदी उदगीर  तालुक्‍यातील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते बालाजी दत्‍ताजी गवारे यांची निवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी जाहीर करून त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.


        जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे,  प्रदेश उपाध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, आ.अभिमन्यू पवार, माजी आमदार विनायकराव पाटील,  माजी आ.सुधाकर भालेराव  यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या सहमतीने  जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी उदगीर तालुक्‍यातील मौजे येनकी येथील बालाजी गवारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या  जिल्हाध्यक्षपदी निवड  घोषित केली आहे. बालाजी गवारे हे गेल्‍या २२ वर्षापासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असून त्‍यांनी आतापर्यंत भाजपाचे तालुका उपाध्‍यक्ष, जिल्‍हा सरचिटणीस व प्रदेश सदस्‍य म्‍हणून काम केले आहे. त्‍यांच्‍याकडे उत्‍तम संघटन कौशल्‍य असून मागास समाज व इतर सामाजिक कार्यात सतत पुढाकार राहीला आहे.


        भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे यांना जिल्हाध्यक्ष कराड यांनी नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, जिपचे माजी सदस्‍य दयानंद कांबळे, गिरीष पाटील, शेषेराव करखेलीकर, संजय पाटील, सुजित जीवणे, ईश्‍वर कपाळे, सतिष राचुट्टे, संजय पाटील भाकसखेडकर, पसचे सभापती रमेश सोनवणे, रेणापूर ता.अध्‍यक्ष दशरथ सरवदे, दिलीप पाटील, श्रीमंत नागरगोजे, रेणापूर ता. महिला आघाडी अध्‍यक्ष अनुसया फड, ललिता कांबळे, शिलाताई आचार्य, मारूती गालफाडे, सचिन सवई, प्रल्‍हाद अनंतवाड, मारूती शिंदे, किशोर काटे, अरूण लांडगे, रूपेश काळे  यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


         भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी जिल्ह्यात भाजपाच्‍या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून पुन्हा एकदा लातूर जिल्हा भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून कायम राहील या दृष्टीने सक्षम  प्रभावी  आणि सक्रिय  कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या पक्षाच्‍या विविध पदावर करीत आहेत.