कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाला नागरिकांनी योग्य ती दक्षता घेऊन सहकार्य करावे -संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर, दि.15:- जगात अनेक देशात कोरोना या संसर्गजन्य  विषाणुचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.  महाराष्ट्रात सुध्दा मागील काही दिवसांत रुग्ण आढळले आहे. या संसर्गला नागरिकांनी न घाबरता  योग्य ती दक्षता घ्यावी व या विषाणू  च्या  प्रतिबंधासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.


    या आजाराची लक्षणे - ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत.


   हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, 
 चेहऱ्याला/ नाकाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
 सॅनीटायझर किंवा साबणाने हात वारंवार धुवावेत.
 खोकला किंवा शिंक आल्यास तोंडाला रुमाल किंवा टिशू पेपर धरावा.
 पुर्ण शिजलेले अन्न शाकाहारी/ मांसाहारी अन्न खावेत.
 मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावेत.
 चिकन, मटन प्रमाणित दुकानातुन घ्यावेत.
 भरपूर पाणी प्यावे.


   अशी काळजी नागरिकांनी घ्यावीत. यासोबतच 
 नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकू नये
 गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
 चेहऱ्याला / नाकाला वारंवार स्पर्श करु नये.
 ताप आणि खोकला असलेल्या रुग्णांचा सहवास टाळावा.
  प्राण्यांचा निकट संपर्क टाळावा.


  महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा संसर्ग पसरु नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबत नागरिकांनी आपली जबाबदारी समजुन शासनास सहकार्य करावे व खालील महत्त्वाच्या सुचनांचे पालन करावे.


 कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नये.
 त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 अफवा किंवा चुकींच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
 तुम्ही या विषाणुग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. व त्यांच्या सल्ल्यांने भरती व्हावे.
 लक्षण आढळून आल्यास काळजी घ्या व शासकीय रुग्णालयांशी संपर्क करावा.
 राष्ट्रीय कॉल सेंटर क्र. 91-11-23978046
 राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. 020-26127394
 टोल फ्रि हेल्पलाईन क्र. - 104
 लातूर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. - 02382 246803 
या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.