उदगीर प्रतिनिधी : दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद उदगीर अंतर्गत उदगीर शहरामधील सर्व फेरीवाले, हातगाडीवाले व पथविक्रेते यांचे मोबाईल अपनुसार सर्वेक्षण सुरु करण्यात आले . हे सर्वेक्षण दि.३० मार्च २०२० पर्यंत होणार आहे. सर्वेक्षणाचे उद्घाटन नगर परिषेदेचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, बापूराव येलमटे मामा, मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार आणि अड.दत्ता पाटील यांच्या हस्ते फेरीवाले यांचे पुष्पहार देऊन व नारळ फोडून करण्यात आले. . सर्वेक्षणासाठी आधार कार्ड. रेशन कार्ड, तहशील कार्यालयाचे अधिवास प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची तात्काळ पूर्तता करावी जेणेकरून आपले सर्वेक्षण लवकर होऊन ओळखपत्र व परवाना देणे प्रशासनाला सोयीचे होणार आहे, सर्वेक्षण करताना सर्वेक्षकास सहकार्य करावे असे आवाहन केले.
सर्वेक्षणाच्या उद्घाटनास नगर अभियंता सतीश शिंगडे, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे, विक्रम हालकीकर, लक्ष्मण जाधव, विशाल गुडसूरकर, फेरीवाला समितीचे अध्यक्ष महेबूब बागवान हमीदसाब, सचिव शेख फयाजोद्दिन शफियोद्दिन, सर्वेक्षक करण इंगोले, अरविंद मोरे, मनोहर चौधरी व अतुल गवारे उपस्थित होते.