उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथे एकाचा निर्घुण खून

उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथे एकाचा निर्घुण खून


उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या डांगेवाडी येथील अझर डांगे या तरुणाने तुकाराम पुंड या शेतकऱ्याची सकाळी सात वाजताच्या दरम्यान पाणी आणण्यासाठी जात असताना आरोपी अझर डांगे व तुकाराम पुंड यांच्यात काहीतरी वाद झाल्या वरून बाचाबाची झाल्याने आरोपी अझर डांगे  यांनी तिक्षण  हत्याराने तुकाराम पुंड यांच्या वर तिक्षण हत्याराने छातीत वार केल्याने त्यांचा  जागीच मृत्यू झाला .
 यासंदर्भात वाढवणा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय नरवडे हे करत आहेत