उदगीर / प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील मौजे गुडसूर येथे राहुल भैया केंद्रे मित्र मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी सोळा संघाचा सहभाग असून प्रथम पारितोषिक 21000 राहुल केंद्रे मित्र मंडळ यांचे तर्फै तर द्वितीय पारितोषक डाॅ अनिल कांबळे 15000 व तृतीय पारितोषक हानमंत हांडरगुळे तर्फे 10000 रु व ट्राॅफी व ईतर बक्षीस ठेवले आहे
या क्रिकेट स्पर्धैचे उदघाटन जि.प. अध्यक्ष राहुलजी केद्रेयांचे हस्ते चौकार मारुन झाले यावेळी राहुल केंद्रे यांचा सत्कार गुडसुर ग्रामस्थातर्फे करणेत आला यावेळी प्रमुख अतिथी विश्वनाथ मुडपे सर हानमंत हांडरगुळे पञकार महेश मठपती बळीदादा केंद्रे व ईतर मान्यवर उपस्थित होते
यावेळी उदघाटनपर भाषणात राहुलभैय्या म्हणाले की क्रिकेट हा असा खेळ आहेकि या खेळामध्यै सामाजिक ऐक्य पहावयास मिळते घडते गावपातळी वरचाच खेळाडु राज्य स्तरापर्यत पोहचु शकतो क्रिकेटचे स्पर्धा वारंवार होत राहाव्यात असे सांगुन शेवटी बोलताना म्हणाले की मी आपल्या आशिर्वादाने जिल्हाध्यक्ष पदापर्यत पोहचलो मला सेवा करणैची संधि मिळाली निश्चितच उदगीरचे नाव उंचावले शिवाय राहाणार नाही जि. प. चे माध्यमातुन गाव परिसरांचे विकासासाठी मी कमी पडणार नाही क्रीकेटचे स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात कुठलेही गाल बोट लागणार नाही याची खेळाडुंनी दक्षता घ्यावी असेही केद्रे यांनी सांगितलै
यावेळी मुडपे सरांनीही समयोचित भाषण केले या कार्यक्रमास खेळाडु क्रिडाप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते