दि. 18/3/2020 रोजी एस.एस.सी. परिक्षेचा विज्ञान भाग-2 या विषयचा पेपर झाला.या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्न 1A मधिल 3 क्रमांकाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाबद्दल विद्यार्थी गोंधळून गेले. मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न व इंग्रजी(सेमी इंग्रजी) माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला तोच प्रश्न वेगळा आहे. मराठी माध्यमाच्या प्रश्न पत्रिकेत विचारलेला प्रश्न 3) इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून....... तयार होते.हा आहे.तर इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत 3) in complete combustion of fuels leads to formation of.....असा आहे. या प्रश्नामध्ये in complete या शब्दामध्ये स्पेस नसल्यामुळे याचा मराठी अनुवाद इंधनाच्या पूर्ण ज्वलनातून .....तयार होतो असा ध्वनित होतो.यामुळे विद्यार्थी गोंधळले गेले.कारण मराठी माध्यमाच्या प्रश्नाचे उत्तर कार्बन मोनोक्साईड असे येते तर इंग्रजी माध्यमाच्या in complete या स्पेस संभ्रमामुळे पूर्ण ज्वलनातूनचे उत्तर Carbon dioxide असे येते.थोडक्यात दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे समान प्रश्नाचे चुकीच्या छपाई मुळे उत्तर वेगवेगळे येत आहे. तरी संबंधित विषय तज्ञ मुख्य नियमांकानी विद्यार्थ्याचे एका गुणाचे नुकसान होनार नाही.यासाठी योग्य त्या गुणदानासाठी परिक्षकांना योग्य त्या सुचना देऊन इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी होत आहे