17 मार्चपासून उदगीर महाराज महोत्सवास प्रारंभ 25 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी ) उदगीर चे आराध्य दैवत श्रीसदगुरु उदगीर महाराज उत्सवाचे आयोजन 17 ते 25 मार्च या कालावधीत उदगीर महाराज समाधी मठ संस्थान किल्ला येथे संपन्न होणार आहे
गुढीपाडव्यानिमित्त 25 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्या हस्ते उदगीर बाबा समाधीस रुद्राभिषेक , ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची पूजा विना पुजन करून हरिनाम सप्ताह प्रारंभ होणार आहे.
दररोज पहाटे चार ते सहा उदगीर महाराज महारुद्र अभिषेेक पूजा, सकाळी 7 ते१० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी१२ एक ते 2 तुकाराम गाथा भजन, दोन ते चार महिला भजन, दुपारी चार ते सहा प्रवचन, सायंकाळी सात ते नऊ हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा कीर्तन, भजन,जागर इत्यादी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दुपारी चार ते सहा ह-भ-प राम किशन महाराज-भ-प रामकिंशन महाराज शिरोळकर, ह.भ.प. योगेश महाराज पुरी शरल्ळळ, सुरेश पाटील नेत्रगावकर, कल्याणकर महाराज, उध्व महाराज हैबतपुरे, मुकुंद महाराज नागलगाव, राज योगी सतीश बिरादार यांचे प्रवचन तर ह.भ.प. एकनाथ महाराज, दामोदर गिरी महाराज ,अप्पा संदीप महाराज होळीकर,दत्तू महाराज, ह.भ.प. प्रशांत महाराज क्षिरसागर ,रघुवीर महाराज हेळंबकर,ज्ञानोबा कारभारी बोंबळीकर, यांचे कीर्तन होणार आहे.तर समतानगर भजनी मंडळ, संप्रदाय सेवा भजनी मंडळ, राम मंदिर महिला भजनी मंडळ, सुगावकर ओंकारेश्वर राम मंदिर महिला भजनी मंडळ, शेषनाथ महिला भजनी मंडळ, विठाई महिला भजनी मंडळ, ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, माऊली महिला भजनी मंडळ ,उदगीर बाबा महिला भजनी मंडळ, वैष्णोदेवी महिला भजनी मंडळ आदी मंडळाचे भजन होणार आहे. उदागिर बाबा उत्सवाचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन उदागिर महाराज मठसंस्थानचे मठाधिश जयशगिर गुरु सतिषगिर महाराज यांनी केले आहे.